आमच्या मुलांना बर्गर खाऊ घाला, क्रूझ ड्रग पार्टीतील आरोपींच्या घरच्यांची मागणी!
सजग मराठी वेब टीम
मुंबई | मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या धडक कारवाई नंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह (Aryan Khan) आठ तरुणांना अटक झाली आहे. मात्र या आरोपींच्या कुटुंबीयांकडून पोरांचे अतिलाड अजूनही सुरु असल्याचं चित्र आहे. एका आरोपीसाठी त्याचे कुटुंबीय खास मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं.
क्रुझवर अटक केलेल्या एका मुलाची आई एनसीबी ऑफिसबाहेर पोहोचली. काही मुलांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत. एका आरोपीचे नातेवाईक त्याच्यासाठी चक्क मॅकडॉनल्डचा बर्गर घेऊन आले, मात्र पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळून लावली.