आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय – पंकजा मुंडे
आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय, पंकजांनी हाणला धनंजय मुंडेंना टोला
शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्यानं त्यांनी आघाडी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी काही बजेट आहे का? कुणाला मदत सुरु आहे का? सगळं बंद आहे पण… पण त्यांची वसुली सुरुय ना.. यांनी मंत्रिपद भाड्याने दिल्याचा घणाघात पंकजा मुंडे यांनी केला.
तुम्ही चांगलं काम करा असं आमचं म्हणणं आहे. जनतेच्या हिताचं काम करा जाहीर अभिनंदन करू. पण राज्यात परिस्थिती काय आहे? दररोज बलात्काराच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशा घटना बघून कसं गप्प बसावं वाटतं? असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.