अजित पवारांचा घोटाळा ५ हजार कोटींपेक्षा मोठा : किरीट सोमय्या यांचा दावा
सातारा | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. याच पार्श्वभूमीवर जरंडेश्वर कारखाना विक्री घोटाळाप्रकरणी माहिती घेण्यासाठी ते आज साताऱ्यात दाखल झाले होते.
यानंतर आता लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने आणि त्यांच्या संचालकांच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी अजित पवारांना पुढील कारवाईचा इशारा दिला आहे. यानंतर अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
तसेच पुढे सोमय्या म्हणले कि, अजित पवारांचा घोटाळा हा 5 हजार कोटींपेक्षाही अधिक असल्याचं त्यांनी आज बोलताना म्हटलं आहे. तर जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे? तसेच किती हजारांचे घोटाळे केले? असे सवाल उपस्थित केले आहेत. जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत पवारांना प्रश्न विचारत राहणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.