सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचा १०वी व १२वीत १००% निकाल!

२५ वर्षांची यशस्वी परंपरा कायम राखत यशाचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला!

पाषाण, १४ मे २०२५ : सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, पाषाण ही शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. २००१ मध्ये सुरू झालेली ही शाळा यंदा आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात प्रवेश करत असून, गेल्या २५ वर्षांपासून यशाची घोडदौड अखंड सुरू आहे.

विद्यार्थ्यांमध्ये केवळ शिक्षण आणि खेळच नव्हे तर करिअरला दिशा देणाऱ्या विविध कौशल्यांचा विकास शालेय जीवनातच व्हावा, यासाठी सह्याद्री स्कूल सातत्याने प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांची पावती म्हणजे यावर्षीही इयत्ता १०वी आणि १२वी (कॉमर्स व सायन्स) या दोन्ही शाखांचा १००% निकाल नोंदवण्यात शाळेला यश मिळाले आहे. पाषाण आणि कोथरूड येथील शाखांनी मिळवलेली ही यशस्वी परंपरा मागील २५ वर्षांपासून अबाधित राहिली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापिका स्वातीताई विनायक निम्हण, पाषाण शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती पवार, तसेच कोथरूड शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा उदास यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मेहनती शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या जिद्द, मेहनत आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलने यंदाही पाषाण व कोथरूड परिसरात गुणवत्तेचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.