येवल्यात महायुती समीर भुजबळांच्या नेतृत्वात निवडणुकीसाठी सज्ज, उद्या होणार प्रचाराचा शुभारंभ
मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जोरदार प्रचाराची होणार सुरुवात
येवला, 23 नोव्हेंबर: येथे नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने उद्या सोमवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ होणारआहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपती मंदिरात नारळ वाढवून या निवडणुकीतील प्रचारास सुरुवात करण्यात येणारआहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले गट) आणि इतर मित्र पक्ष यांच्या समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित युती केलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणारआहे.
सकाळी नऊ वाजता मेनरोडवरील गणपती मंदिरात प्रचारारंभाचा कार्यक्रम पार पडणारआहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी नारळ वाढवून शुभेच्छा देतील. त्यानंतर येवला शहरातील विविध मार्गांतून प्रचार रॅली काढण्यात येईल. ही रॅली बुरूड गल्ली मार्गे डी जी रोड, साईबाबा मंदिर, पंडत पैठणी कॉर्नर, लक्कडकोट पैठणी, सहस्त्रार्जून मंदिर, गांधी मैदान, क्षत्रिय रुग्णालय, गंगा दरवाजा, पोस्ट ऑफिस, शिंपी गल्ली येथून पुढे मेनरोड, सी.डी.पटणी, बालाजी गल्ली, नपा रोड मार्गे आझाद चौक येथून टिळक मैदानापर्यंत पोहोचणारआहे.
या प्रचार रॅलीत महायुतीचे सर्व पक्षाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यांनी उत्साहात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. रॅलीदरम्यान उमेदवार नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर चर्चा करतील. महायुतीने येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या योजना नागरिकांसमोर मांडणार आहेत. समीर भुजबळ यांनी यावेळी महायुतीच्या उमेदवारांवर नागरिकांनी विश्वास टाकावा असे अपील केले आहे.
निवडणुकीपूर्वीच्या काळात हा महत्त्वाचा कार्यक्रम ठरेल येवल्यात राजकीय वातावरण उत्साही बनले आहे. महायुतीने आपल्या उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या या प्रचार कार्यक्रमामुळे निवडणुकीच्या वातावरणात गंभीरता आलेली दिसते. पुढील काही दिवसात महायुतीचे इतर प्रचार कार्यक्रम असतील अशी माहिती पक्षाधिकाऱ्यांनी दिली आहे.
निवडणुकीसंदर्भात महायुतीने आपले घोषणापत्र नागरिकांसमोर ठेवणार असल्याचे सांगितले जाते. येवला शहराच्या विकासासाठी सर्व पक्षांनी आपापले कार्यक्रम राबविणार असल्याने निवडणुकीचे वातावरण अधिकच रोमांचक बनले आहे. महायुतीच्या या प्रचार कार्यक्रमानंतर इतर पक्षांचेही प्रचार कार्यक्रम सुरु होतील अशी शक्यता आहे.