मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून पारंपारिक संस्कृतीचा सुंदर सन्मान

वसुबारस निमित्ताने शहरात विविध ठिकाणी होणार गोमाता पुजन

पुणे, १६ ऑक्टोबर :

दिवाळीचा पहिला दिवस ‘वसुबारस’ हा दिवस मातृत्व, समृद्धी आणि गोधन पूजनासाठी ओळखला जातो. या दिवशी गोधनाची पूजा करून समृद्धीची प्रार्थना करण्याची परंपरा आहे‌ .या परंपरचे जतन करण्याचा उद्देशाने मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुढाकार घेऊन शहरात वसुबारस पूजनाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमाद्वारे गोधन पूजनाची परंपरा पुढे नेण्याबरोबरच लोकसहभागातून सांस्कृतिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे. शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८पर्यत वसुबारस पुजन करण्यात येईल .नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह आणि श्रद्धा दिसून येत आहे.

औंध येथील परिहार चौक,चंद्रकांत गायकवाड चौक औंध , (मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळ), भाले चौक, नागरस रोड औंध , बोपोडी येथील अमित मुरकुटे संपर्क कार्यालय, भाऊ पाटिल रोड येथील पुणे आयटी पार्क, आदि ठिकाणी वसुबारसच्या निमित्ताने गोमाता पुजन होणार आहे.

मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुबारस पूजनाच्या माध्यमातून संस्कृती, श्रद्धा आणि समाजबंध यांचा संगम घडवून आणला जात आहे.
त्यांच्या या सामाजिक सांस्कृतिक पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे, अनेक नागरिकांनी उपस्थित राहून पूजनात सहभागी व्हावे.अधिक माहितीसाठी www.sunnynimhan.com या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.