माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृत्ती

अजित पवारांच्या मृत्यूवर शिवसेनेच्या शहराध्यक्षांची अपमानजनक टिप्पणी

संगमनेर ३१ जानेवारी, २०२६) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हळहळ व्यक्त केली जात असताना संगमनेरमध्ये मात्र शिंदे यांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे यांनी माणुसकीला काळीमा फासणारे वक्तव्य केले आहे. दिनेश फटांगरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत “जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या म्हणीचा प्रत्यय आज आला” अशी टिप्पणी केली आहे. हे दिनेश फटांगरे आमदार अमोल खताळ यांचे “राईट हॅन्ड” म्हणून ओळखले जातात. अमोल खताळ यांची प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट ते स्वतः आपल्या अकाउंट वरून शेअर करत असतात.

मृत्यूनंतर वैरही संपतं असं म्हणतात. आपल्या अशा उदात्त संस्कृतीत दिनेश फटांगरे यांच्यासारख्या द्वेषपूर्ण प्रवृत्ती विष कालवण्याचे काम करतात. दिनेश फटांगरे यांच्या या वक्तव्याचा नागरिकांकडून निषेध व्यक्त होत आहे. तसेच, अशा व्यक्तीला हाताशी धरून राजकारण करणारे अमोल खताळ यांच्यावरही जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.