भुजबळ यांच्या हस्ते अस्थिव्यंग दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहाय्य उपकरणांचे वितरण
मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवला-लासलगाव मतदारसंघात दिव्यांगांसाठी नि:शुल्क कृत्रिम अवयव व कॅलीपर्स वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन
येवला, 27 जून:राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरातील राधाकृष्ण लॉन्स येथे अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी नि:शुल्क कृत्रिम हातपाय बसविणे व कॅलीपर्स वितरण शिबिर यशस्वीपणे पार पडले. नाशिक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभाग, एलिम्को व एस.आर. ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिरात मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहाय्य उपकरणे वितरित करण्यात आली.
मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले की, “दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी मतदारसंघात अशी शिबिरे नियमितपणे आयोजित केली जातील.
गेल्या काही आठवड्यांत झालेल्या तपासणी शिबिरात नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तींना आज त्यांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव व कॅलीपर्स प्रदान करण्यात आले आहेत. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी आम्ही अधिक व्यापक योजना आखत आहोत. येवला-लासलगाव मतदारसंघात दर तीन महिन्यांनी अशी शिबिरे आयोजित केली जातील. सर्व गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले
या शिबिरामुळे दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या या पुढाकारामुळे समाजाच्या वंचित घटकांना सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असे मंत्री भुजबळ यांनी आश्वासन दिले आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, संभाजी पवार, किशोर सोनवणे,अल्पसंख्यांक आयोगाचे आयोगाचे सदस्य हुसेन शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,विश्वासराव आहेर, किसनराव धनगे,पप्पू सस्कर, अल्केश कासलीवाल, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, मच्छिंद्र थोरात, राजुसिंग परदेशी, बाळासाहेब पिंपरकर, बबनराव साळवे, सुनील पैठणकर, सचिन कळमकर, डॉ. प्रवीण बुल्हे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.