भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न काटे यांना मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी दिल्या शुभेच्छा

माजी नगरसेवक श्री. सनी निम्हण यांनी नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. शत्रुघ्न काटे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी श्री. काटे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांच्या नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छा भेटीत पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी पुढील काळात मिळून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. श्री. निम्हण यांनी श्री. काटे यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा देताना सांगितले की, त्यांच्या कार्यकुशलतेतून पक्षाचे कार्य अधिक गतिमान आणि प्रभावी होईल, असा विश्वास आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.