प्रश्न तुमचे, माध्यम मी… सत्यजीत तांबे यांनी केलेल्या नव्या घोषणेची राज्यभरात चर्चा
नाशिक दि.२३ मे : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 ते 22 डिसेंबर 2024 या दरम्यान पार पडणार आहे. अधिवेशन म्हटलं की प्रश्न उत्तर आलेच. याच पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी एक घोषणा केली आहे. जनतेने जास्तीत जास्त प्रश्न व समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. office@satyajeettambe.com या अधिकृत इमेलवर त्यांनी नागरिकांना प्रश्न व समस्या पाठवण्याचे आवाहन केले आहे.
मागील वर्षभरात पार पडलेल्या विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात सत्यजीत तांबे यांनी मोठ्या प्रमाणावर जनतेचे प्रश्न व समस्या सरकार दरबारी मांडल्या होत्या. यातील अनेक प्रश्न सुटले असून काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रातील एक जबाबदार व अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या कामकाजाचे ३६५ दिवस पूर्ण झाल्यानंतर एक अहवाल देखील जनतेच्या समोर मांडला होता.
आपल्या स्वतःच्या कामाचा लेखाजोखा पारदर्शकपणे लोकांसमोर मांडणारा आणि त्याबद्दल लोकांचे अभिप्राय मागून तो अहवाल देखील जनतेसमोर मांडणारा असा प्रामाणिक लोकप्रतिनिधी फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशातीलच एकमेव लोकप्रतिनिधींतून त्यांचं नेहमीच कौतूक होत असतं. आता त्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे