नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून… प्रेरणा आबांच्या शिवभक्तीची, परंपरा महाशिवरात्री फराळाची!

पुणे : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त झुंज बंगला येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तीमय वातावरणात फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, निष्ठा आणि शिवभक्तीचा वारसा जपत हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, यामागे आबांची अखंड शिवभक्ती हीच मुख्य प्रेरणा आहे.

आबांसाठी भगवान श्री शिवशंकरांवरील भक्ती ही केवळ धार्मिक आस्था नव्हती, तर त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती. त्यांची हीच प्रेरणा पुढे नेत, नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकारातून हा फराळ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत झुंज बंगला, सर्व्हे नं. १९, सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. दिवसभर शिवनामस्मरण आणि भक्तीमय वातावरणात भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या पवित्र प्रसंगी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तसेच आबांच्या शिवभक्तीची परंपरा अधिक बळकट करावी, असे आवाहन आयोजक भाजपा नेते सनी निम्हण यांनी केले आहे.

भक्ती, एकता आणि स्मरण यांचा संगम असलेला हा उपक्रम महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांसाठी श्रद्धेचा विशेष क्षण ठरणार आहे. 🔱

Leave A Reply

Your email address will not be published.