दिलीप वळसे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन आणि लोकार्पण संपन्न
दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील विकासकामांना गती
आंबेगाव, २७ ऑक्टोबर : राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे आंबेगाव तालूक्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. दिलीप वळसे पाटील व म्हाडा, पुणे चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरु असलेल्या आणि पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण तसेच मंजुरी मिळालेल्या विकासकामांचे भूमिपूजन झाले.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेला आंबेगाव तालुका प्रदेशाच्या भौगोलिक स्थितीमुळे प्रगतीबाबत जिल्ह्याचा इतर भागापेक्षा काहीसा मागे होता. विकासाचा हा अनुशेष कमी करण्यासाठी आमदार दिलीप वळसे पाटिल विशेष प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून वळसे पाटील यांच्या पुढाकाराने तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास पोहोचला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. या अंतर्गत होणाऱ्या आणि पूर्ण झालेल्या काही विकासकामांचे उद्घाटन तसेच मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन आजच्या गावभेट दौऱ्यात झाले.
या दौऱ्यात फुलवडे, कोंढरे, माळीण, नानवडे, नाव्हेड, पंचाळे, पिंपरगणे, तिरपाड, अडिवरे, आहुपे, असाणे, बोरघर आणि डोण आदि गावातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.या गावांसाठी एकूण ₹१७ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना आज प्रारंभ करण्यात आला. रस्ते बांधकाम, जलनिस्सारण व्यवस्था, शाळा दुरुस्ती, ग्रामसभागृह, स्मशानभूमी विकास, अंगणवाडी बांधकाम आणि इतर सार्वजनिक सोयीसुविधांच्या उभारणीसाठी ही कामे करण्यात येत आहेत.
या सर्व कामांमुळे परिसराचा वेगाने कायापालट होणार आहे. प्रलंबित असलेली कामे पूर्ण होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग असलेल्या आंबेगाव तालुक्याचा विकास फक्त दिलीप वळसे पाटीलच करू शकतात. डोंगराळ असल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात फक्त दिलीप वळसे पाटीलच आणू शकतात, हे या विकासकामांमुळे सिद्ध झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ‘ग्रामविकासातून सर्वांगीण प्रगती’ या संकल्पनेतून प्रत्येक गाव सशक्त, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.