औंधचा कुस्तीपटू विराज रानवडे याची ‘कुमार भारत केसरी’ स्पर्धेत दणदणीत कामगिरी!
औंधचा अभिमान विराजचे मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्याकडून विशेष अभिनंदन!
औंधचा कुस्तीपटू विराज रानवडे याची ‘कुमार भारत केसरी’ स्पर्धेत दणदणीत कामगिरी!
औंधचा युवा कुस्तीपटू विराज विकास रानवडे याने हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘भारत केसरी दंगल’ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ‘कुमार भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला. त्याने मिळवलेल्या या यशामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान उंचावला असून माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी या यशाबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या.
विराजच्या या विजयामागे त्याचे वडील आणि प्रशिक्षक विकास रानवडे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे मोठे योगदान आहे. पारंपरिक कुस्तीचा वारसा लाभलेला विराज आज नवे शिखर गाठत आहे, ही महाराष्ट्रातील मल्लांसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब ठरणार आहे.
विराज रानवडे याचे या यशाबद्दल देशभरातून कौतुक होत असून त्याला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना महाराष्ट्राच्या मातीतील हा मल्ल देशपातळीवर नक्कीच आपली छाप उमटवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.