आ. पंकज भुजबळांच्या हस्ते येवला मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका

मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे मार्गी लावणार-आमदार पंकज भुजबळ

येवला, दि.१८ नोव्हेंबर :येवला मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहे. अद्यापही विविध विकासाची कामे आपल्याला मतदारसंघात करायची आहे. त्यादृष्टीने नागरिकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून सर्व कामे मार्गी लावली जातील असे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी केले.

आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या ६ कोटी २८ लाख निधीतून दिंडोरी तास, नांदूर मध्यमेश्वर, गाजरवाडी, कोळगाव, देवगाव, रुई, शिरवाडे येथील रस्ते, तलाठी कार्यालय, सभामंडप, संरक्षण भिंत, पाईप लाईन यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला विधानसभा मतदारसंघात अनेक दर्जेदार विकासकामे केली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांची कामे अद्यापही मतदारसंघात सुरू आहे. हा मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चिला जाणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात झालेल्या विकासकामांचा देशभरात गौरव देखील झालेला आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे प्राधान्य आहे. त्यामुळे यापुढील काळातही विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते या विकास कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन

👉🏻 तास(दिंडोरी) ता. निफाड येथील दिंडोरी फाटा ते नांदूरमध्यमेश्वर जॅकवेल पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२ कोटी ४४ लाख

👉🏻 नांदूरमध्यमेश्वर येथे जिल्हा वार्षिक पर्यटन विकास योजनेतून नांदूरमध्यमेश्वर मारुती मंदिर परिसर भक्त निवास, सभामंडप, बालसंस्कार केंद्र योगा केंद्र, पिण्याच्या पाण्याची सुविधा व परिसर सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन – र.रु.७५ लाख

👉🏻 नांदूरमध्यमेश्वर येथे मंडल अधिकारी कार्यालय लोकार्पण – र. रु.३५ लाख

👉🏻 नांदूरमध्यमेश्वर येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत भूमिगत गटार करणे – र.रु.१५ लाख

👉🏻 नांदूरमध्यमेश्वर येथे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत भूमिगत गटार व काँक्रीटीकरण करणे – र.रु.१५ लाख
नांदूरमध्यमेश्वर येथे आमदारांच्या स्थानिक विकास योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मोकळ्या जागेवर नाभिक समाजासाठी सभा मंडप बांधकाम करणे – र.रु २० लाख

👉🏻 नांदूरमध्यमेश्वर येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण – र.रु. ११ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे गाजरवाडी,ता.निफाड येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत गोसावी बाबा मंदिरा समोर मोकळ्या जागेवर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१५ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे – र.रु.४ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे – र.रु.१५ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधणे – र.रु २० लाख

👉🏻 गाजरवाडी येथे जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे कामाचे लोकार्पण – र.रु.१५ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे ग्राम महसूल अधिकारी(तलाठी) कार्यालय बांधणे कामाचे लोकार्पण – १५ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत बुवाजी बाबा मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे लोकार्पण – र.रु.१५ लाख

👉🏻 गाजरवाडी येथे जनसुविधा योजनेंतर्गत नविन स्मशानभूमि कामाचे लोकार्पण – र.रु.२० लाख

👉🏻 सारोळे थडी येथे जिल्हा परिषद शाळा येथे ३ वर्गखोली बांधकाम करणे कामाचे लोकार्पण – र. रु.२८ लाख

👉🏻 सारोळे थडी येथे पेव्हर ब्लॉक बसवणे कामाचे लोकार्पण – र.रु.१० लाख

👉🏻 कोळगांव येथे अल्प संख्यांक योजनेअंतर्गत मुस्लिम वस्तीत शादीखाना बांधणे व रस्ता कॉक्रीटीकरण करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१५ लाख

👉🏻 शिरवाडे येथे अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत कब्रस्थान संरक्षण भिंत बांधणे कामाचे भूमिपूजन -र.रु.८.४४ लाख

👉🏻 देवगांव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत गोदावरी डावा कालवा मैल क्र.१२.५०० परिसरात गळती होवून बॅरोपिटमध्ये साचत असलेले पाणी काढून देण्यासाठी भूमिगत पाईपलाईन करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१० लाख

👉🏻 देवगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत गोदावरी डावा कालवा मैल क्र.१२.५०० परिसरात गळती होवून बॅरोपिटमध्ये साचत असलेले पाणी काढून देण्यासाठी चर करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१० लाख

👉🏻 देवगाव येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत डी.आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२० लाख

👉🏻 रुई येथे स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इंटरॲक्टिक व टच बोर्ड पुरवणे स्मार्ट क्लास करणे कामाचे भूमिपूजन – र.रु. ०६ लाख

👉🏻 रुई निफाड येथील मूलभूत सुविधा अंतर्गत गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे -र.रु.१० लाख

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, डॉ.श्रीकांत आवारे, पांडुरंग राऊत, सुरेखा नागरे, अशोक नागरे, भाऊसाहेब बोचरे, बाळासाहेब पुंड, विलास गोरे, शिवाजी सुपनर, विनोद जोशी, अनिल सोनवणे, संदीप तासकर, कैलास तासकर, सोहेल मोमिन, मोहसीन शेख, भागवत शिंदे, विजय डांगळे, गणपत नाईकवाडी, दिनकर आरोटे, माधव जगताप, विठ्ठल गाजरे, गोरख शिंदे, राहुल आहेर, प्रकाश घोटेकर, बाजीराव गायकवाड, भास्कर गाडेकर,अमोल सोनवणे, दत्तात्रय गाजरे, कचरु शिंदे, ओम राऊत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार पंकज भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले की विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून सर्व कामे मार्गी लावली जातील. त्यांनी म्हटले की येवला मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली असून अद्यापही विविध विकासाची कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवून सर्व कामे मार्गी लावली जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.