आयकर विभागाच्या छापेमारीत तब्बल १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड

आयकर विभागाच्या छापेमारीत मुंबई, पुणे, गोवा, जयपूरमध्ये तब्बल १८४ कोटींची बेहिशोबी मालमत्ता उघड!

देशभरात गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाकडून ( income tax department) वेगेवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या केलेल्या छापेमारीत आयकर विभागाकडून धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत तब्बल १८४ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली आहे. सीबीडीटीने शुक्रवारी या संदर्भात माहिती देत म्हटलं, “०७ ऑक्टोबर २०२१ पासुन विविध ठिकाणी धाडसत्र करण्यात आलं. मुंबई , पुणे , बारामती, गोवा आणि जयपूर येथे जवळपास ७० ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली होती”.

सीबीडीटीने सांगितले की, दोन रिअल इस्टेट उद्योगांच्या कार्यालयावर आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, संस्थांवर छापेमारी करण्यात आली. झाडाझडती दरम्यान बेहिशेबी आणि बेनामी आर्तिक व्यवहारांचा खुलासा झाला आहे. काही संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे आढळून आले आहेत. तसेच या दोन्ही ग्रुप्सच्या जवळपास १८४ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेचा खुलासा झाला आहे. छापेमारी दरम्यान ०२.१३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि ४.३२ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकऱणी अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. दोन्ही ग्रुप्सने केलेले व्यवहार संशयास्पद आढळून आले आहे असंही आयकर खात्याने म्हटलं आहे.

बोगस शेअर प्रीमिअर, संशयास्पद असुरक्षित कर्ज, विशिष्ट सेवांसाठी आगाऊ रक्कम, लवाद सौदे यासारख्या संशयास्पद मार्गाने ही बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची माहिती समोर येत आहे. संशयास्पद पद्धतीने जमवलेला हा पैसा मुंबईतील विविध ठिकाणी कार्यालय इमारत, गोव्यात रिसॉर्ट, महाराष्ट्रातील विविध भागांत शेतजमीन, साखर कारखान्यांत गुंतवणूक, दिल्लीत फ्लॅट घेण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वा संपत्तीची एकूण किंमत जवळपास १७० कोटी रुपयांच्या घरात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.